सिडको फ्रि होल्ड झाल्याने आमदार सावेंचे पारडे जड, पूर्व विधानसभा मतदारसंघात वाढत आहे वर्चस्व

Foto

औरंगाबादसिडको परिसरातील तब्बल ८८ हजार घरे राज्य शासनाने फ्रि होल्ड करण्याचा निर्णय घेतल्याने पूर्व मतदारसंघात आमदार अमुल सावे यांचे पारडे जड होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या वीस वर्षापासून सिडकोवासी त्रस्त यामुळे त्रस्त असल्याची दखल घेत पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांनी पुढाकर घेऊन शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने 20 डिसेंबर रोजी ऐतिहासिक निर्णय देऊन नागरीकांची घरे मालकी हक्काची केूली. आमदार सावेंनी केलेल्या या कामावर पूर्व मतदार संघातील नागरीक समाधानी झाले असुन आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार अतुल सावेंचे पारडे जड होण्यास नागरीक आपला कौल देत आहे.

 

सातत्याने सर्वसामान्य नागरीकांच्या राज्यात राहणारे आमदार अतुल सावे यांनी आपल्या कामातून आणि स्वभावातून नागरीकांचा विश्‍वास संपादन केला आहे. पूर्व मतदार संघातीलच नव्हे तर शहरातील कोणत्याही व्यक्तीच्या मदतीसाठी आमदार अतुल सावे धावून जातात. पूर्व मतदार संघामध्ये त्यांचा वाढता जनसंपर्क असून कार्यकर्त्यांची मजबुत फळी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. पूर्व मतदार संघात सिडकोच्या घरांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या नागरीकांचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आ. अतुल सावे यांनी निवडणूकी दरम्यान आपल्या जाहिरनाम्यात सिडकोच्या घरांना फ्री होल्ड करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा उल्लेख केूला होता. त्यानुसार आ. सावे यांनी याबाबत आग्रही भूमिका घेवून निवडणूकीपूर्वी दिलेले आश्‍वासन पूर्ण केल्याने नागरीकांनी त्यांच्यावर आपला प्रचंड विश्‍वास सांजवार्ता ऑनलाईनशी  बोलतांना व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात पूर्व मतदार संघात पुन्हा एकदा आमदार अतुल सावे यांचेच वर्चस्व असणार असे चित्र सध्या दिसून येत आहे.

 

कामगिरीमुळे विरोधकांत भरली धडकी

पूर्व मतदार संघातून आमदार अतुल सावे पहिल्यांदाच निवडनू आले. याअगोदर काँग्रेस च्या तब्यात हा मतदार संघ होता. आमदार सावे यांनी आपल्या कामगिरीने काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदार संघ काबीज करत आपले वर्चस्व सिद्ध की आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडीविण्यासाठी सावे यांनी नेहमीच प्राधान्य दिल्याने नागरिकांचा त्यांच्या कार्यालयात राबता नेहमीच दिसून येतो. या पूर्व मतदार संघावर अनेक इव्ह्यूक उमेदवारांचा डोळा आहे. मात्र आमदार सावे यांचे वाढते वर्चस्व आणि कामगिरीमुळे विरोधात धडकी भरली असून अनेक इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सावे हे मतदारावर प्रभाव पाडण्यासाठी आणखी कोणकोणत्या किमया करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.